TheClearNews.Com
Monday, July 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली शपथ ; वाचा राज ठाकरेंची प्रतिज्ञा जशीच्या तशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज यांनी उपस्थित असलेल्या तमाम मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि एक शपथ देखील दिली. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू”, अशी शपथ राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

मनसेने आज शिवाजी पार्कवर तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या सोहळ्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. काही मनसे कार्यकर्ते तर भगवे कपडे परिधान करून आले होते. यावेळी भगवे झेंडे उंचावत ढोलताशाच्या दणदणाटात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दुमदुमून गेला होता.

राज यांनी दिली प्रतिज्ञा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना प्रतिज्ञा दिली. शिवजयंती निमित्त आपण सर्व शिवतिर्थावर जमलो आहोत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. शिवजयंती निमित्ताने सर्वांना एक पक्षातर्फे शपथ देणार आहे, ती शपथ माझ्या बरोबरीने बोलायची आहे.

“आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणी नंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्व जण प्रयत्नांची पराकष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जातीजातीत हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल. इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर सुखर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधु भगिनींना, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल यासाठी जे पडेल ते करू.

छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत. याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची सर्व निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

पोलीस भरतीमध्ये 'एनसीसी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार 'हा' लाभ ; राज्य सरकारचा मोठा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतला विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव !

March 23, 2023

जळगाव तालुक्यातील उमाळ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालनंतर तलवार हल्ला

January 21, 2021

कापूस चोरून नेत असताना एकाला रंगेहात पकडले ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

October 31, 2022

बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार : श्रीराम पाटील !

April 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group