TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

कारमधून आले होते चोरटे; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला ‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ असल्याचा बनाव करून भामट्यांनी हातचलाखीने लुटले. कारमधून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाला जवळ बोलावून त्यांच्या हातातील तब्बल ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून ते पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर वृद्धाने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुलमोहर हौसिंग सोसायटी, गिरणा पंपिंग रोड येथे राहणारे दिलीप बाबूराव सुरवाडे (वय ६८) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक संपवून पायी घरी परतत होते. वाघनगर जवळील ‘जय भवानी कॅटरर्स’च्या गोदामासमोर रस्त्यावरून जात असताना, गिरणा पंपिंग रोडच्या बाजूने एक पांढऱ्या रंगाची, विना नंबरची मारुती सुझुकी चारचाकी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. गाडीमध्ये एक चालक आणि मागे एक निर्वस्त्र बसलेला व्यक्ती असे दोघे जण होते. चालकाने सुरवाडे यांना गाडीतूनच यहाँ भोलेनाथ का मंदीर कहाँ है? अशी विचारणा केली. सुरवाडे यांनी रेल्वे पुलाकडे सरळ जाण्याचा रस्ता सांगितला. मात्र, मला ऐकू येत नाही, पुढे येऊन सांगा, असे चालकाने म्हटल्याने सुरवाडे गाडीजवळ गेले. तेव्हा चालकाने सांगितले की, गाडीमध्ये हरिद्वारहून साधू आले आहेत, तुम्ही त्यांच दर्शन घ्या. वृद्ध सुरवाडे यांनी त्या दोघ संशयितांना अंगठी परत मागितली असता, रुको जरा, रुको जरा असे म्हणत चालकाने गाडीचा वेग वाढवून तिथून पळ काढला. रस्त्यावर कोणीही नसल्याने मदतीसाठी केलेली आरडाओरड निष्फळ ठरली. याप्रकरणी सुरवाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून विना नंबरच्या वाहनाचा आणि संशयितांचा शोध सुरू केला आहे.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

पैसे नको आशिर्वाद द्या म्हणताच काढली अंगठी

सुरवाडे यांनी गाडीच्या क्लिन बाजूला जाऊन हात जोडले असता त्या निर्वस्त्र व्यक्तीने खिडकीची काच खाली करून आशीर्वाद म्हणून सुरवाडे यांच्या हातात १०० रुपयांची नोट ठेवली. सुरवाडे यांनी मला पैसे नको, फक्त आशीर्वाद द्या, असे म्हणताच त्या भामट्याने हातचलाखी केली. त्याने क्षणात सुरवाडे यांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटातील पुष्कराज खडा असलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRing stolen from elderly man by someone posing as a Haridwar sadhu

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा खून ; शरीरावर चाकूचे अनेक वार !

September 9, 2023

ब्राऊन शुगर प्रकरण ; मुख्य सूत्रधाराला एलसीबीने केली अटक !

December 19, 2021

राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

October 29, 2020

स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवले धन्यवाद ; शरद पवारांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group