TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी बळकटीसाठी संवादयात्रा एक यशस्वी पाऊल : भैय्यासाहेब पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2022
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील नवीन -जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली जन संवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारांशी संवाद साधून वैयक्तिक समस्यासह गावोगावच्या अडिअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने सुरु असलेली ही संवाद यात्रा राज्यासाठी मॉडेल ठरू शकते, रोहिणी ताईंच्या मनातही विकासाची तळमळ असल्याचे यावरून दिसून येते. रोहिणी ताईंनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे दिशादायी असून अभिनंदनीय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा करू नका,आता यापुढे रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा “असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांनी संवाद यात्रेदरम्यान उपस्थिताना केले. याप्रसंगी नाथाभाऊ जरी राज्याचे आमदार असले तरी त्यांच्या आमदार निधीवर आपला मतदार संघ सर्वात जास्त हक्कदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याकडून चूक झाली, तेव्हा झालेली चूक आता सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर विजयी झालेला आमदार जो पवार साहेबांना झाला नाही, जो शिवसेनेला झाला नाही तो जनसामान्यांना काय होणार?असा प्रश्न करत यापुढे भक्कमपणे रोहिणीताईंच्या पाठीशी उभे राहायचे आहे, आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत अजित पवार साहेब,सुप्रिया ताईं, जयंत पाटील साहेबांचे हात मजबूत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

गेले तिस वर्ष विकासाचे राजकारण केले -एकनाथराव खडसे
यावेळी बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, गेले तिस वर्ष आपण या मतदारसंघाचे नेतृत्व केले. या तिस वर्षात सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तिस वर्षात विकासाचे राजकारण केले. बोदवड तालुक्याची निर्मिती केली. त्यामुळे तालुक्यात सर्व प्रशासकीय कार्यालये आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणली. बोदवड तालुक्यातील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडले. बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली ती पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. माजी जलसंपदा मंत्री यांनी या योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून त्यातून योजनेचे उर्वरित काम सुरू होईल

आपण तिस वर्ष सतत विकासाचे राजकारण केले. आताचे आमदार हे मंजूर विकास कामांवर स्टे आणणारे आमदार आहेत. शरद पवार साहेबांनी आपल्याला आमदार केले आता आपल्या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

संवाद यात्रेच्या चौथ्या दिवशी बोदवड तालुक्यातील राजूर,वरखेड बु, वरखेड खु., निमखेड, एनगाव जाऊन या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यात्रेदरम्यान विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, यात्रेत यात्रेत ,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपुत, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान,मुजमिल शाह,माजी प स सभापती किशोर गायकवाड,अनिल वराडे, अनिल पाटील,भागवत टिकारे,दिपक वाणी,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ ए एन काजळे,विजय चौधरी,जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे,रामराव पाटील,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत, वाय डी पाटील,आनंदा पाटील, नईम बागवान,भगतसिंग पाटील, मुकेश कर्हाळे,कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील,संदिप देशमुख,प्रदिप साळुंखे,अतुल पाटील, बाळाभाऊ भालशंकर,रणजित गोयनका,बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, संदिप पाटील,भैय्या पाटील, विकास पाटील,वंदना पाटील, प्रतिभा खोसे,कविता गायकवाड,या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, वंदना पाटील ,प्रतिभा खोसे,कविता गायकवाड, अश्विनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

एनगाव येथील डॉ विष्णू वराडे, एन .डी. बोडे,विनोद कोळी,महेंद्र बोडे, सरदारसिंग पाटील,सरपंच अन्नपूर्णाताई कोळी, महेश तळेले, जितेंद्र तळेले आणि ग्रामस्थ, वरखेड खु येथील वंदना ताई पाटील, सुनिल चौधरी, अविनाश पाटील, विशाल पाटील,विनोद पाटील,गणेश पाटील, अरुण मोरे, आनंदा पाटील, प्रियंका ताई मोसे, भास्कर मोरे, सागर पाटील, शंकर पाटील, लक्ष्मण चौधरी, मधुकर चौधरी, मधुकर सोनवणे उपस्थित होते

राजूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सरपंच प्रमोद शेळके, उपसरपंच मोहन चौधरी, साहेबराव बिजारने, वैभव पाटील, गोविंदा शेळके, कडूभाऊ लुटे,युवराज शेळके, संजय शेळके, कैलास बिजारने,नितीन ताड, अर्जुन काळा,संतोष जाट,सुभाष शेळके, नंदू तायडे, विजय तायडे,अमोल पाटील, भागवत पाटील, विकास पाटील, दिपक शेळके, अक्षय शेळके आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वरखेड बु येथील अनिल पाटील, महेश पाटील, सरपंच वंदना ताई पाटील, उपसरपंच शिलाताई तायडे, कलाबाई चौधरी,भारती ताई वराडे, भागवत पाटील, श्रीकांत भोळे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. निमखेड येथे रमेश सुरंगे सर, संतोष पाटील, विकास लक्ष्मण पाटील,अनंता गलवाडे, बाबू भाऊ पाटील, विकास पाटील, प्रशांत पाटील, सदाशिव वाघ, राहुल वाघ, सदाशिव पाटील, प्रमोद चौधरी, प्रभाकर पाटील, उखा भाऊ पाटील आदीची उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

जळगाव हादरले : शिवकॉलनी परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे संविधान दिन उत्साहात साजरा…

November 26, 2020

दुचाकीला टांगलेली बॅग लांबवली ; 2 लाख 75 हजाराची रोकड लंपास !

October 5, 2023

चोपड्यातील मुख्य बाजारपेठेतून महिलेने लांबवली अडीच लाखाची रोकड !

November 8, 2023

अरे देवा ! ऑगस्ट महिन्यातच येणार कोरोनाची तिसरी लाट ; संशोधकांचा दावा

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group