TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार !

आरोपीवर दहा मर्डर, तीन बलात्कार आणि नऊ जबरी चोरीचे गुन्हे ; सापळा रचून केली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवून ४८ तासांत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी एकप्रकारे सिरीयल किलर असून त्याने दहा खून केले आहेत. तसेच, त्याच्यावर इतर पंधरा गुन्ह्याची नोंद राज्यातील पोलिस ठाण्यात आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. अजीज खान महंमद खान पठाण (३९, ता. उमरखेड ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सात वर्षांपूर्वीचा सिरियल किलर असल्याचे समोर आले असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

१० ऑक्टोबर रोजी येथील एका शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अकरा वर्षीय मुलीस फूस लावली. माझी मुलगी तुझ्या वर्गात आहे. मी तुला शाळेत सोडून देतो, असे म्हणून आरोपीने जबरदस्तीने मुलीला दुचाकीवर बसवून नेले. शहराजवळील करोडी पांदण रस्त्याकडे दुचाकी घेऊन निर्जनस्थळी नेत जबरीने अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर जिवे मारेल, अशी धमकी देत पुसद मार्गावरील मंदिराजवळ आणून सोडले. या घटनेमुळे शाळा प्रशासन व तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

मोबाइलच्या लोकेशनवरून व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळलेल्या मोटरसायकलच्या फुटेजवरून आरोपीस उमरखेडजवळील एका गावातून अटक केली. आरोपीवर यापूर्वी १० खून व इतर १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत आहे. गत महिन्यात २७ सप्टेंबरला जामिनावर आरोपीची सुटका झाली होती. त्याने टार्गेट करून मुलगी शोधायची म्हणून रेकी करून हे कृत्य केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितले.

दरम्यान, आरोपीवर दहा मर्डर, तीन बलात्कार आणि नऊ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मराठवाडा- विदर्भातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो कारागृहातून पॅरोलवर गावी आला होता. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी कुख्यात निघाल्याने खळबळ उडाली आहे.

हा खटला जलदगती न्यायालयात चांगले सरकारी अभियोक्ता मागवून आरोपीला लवकर जमानत मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलिस अधिकारी विनायक कोते, पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे, उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ, सपोनि सतीश खेडकर उपस्थित होते. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

महिला दुय्यम निबंधकास लाच घेताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

June 17, 2025

पत्रकार सूर्यकांत कदम यांना पत्रकार भूषण पुरस्कार

October 18, 2022

राज्यात भोंग्यांवरुन जे काही चाललंय ते मनोरंजन म्हणून पाहा : खडसे

May 17, 2022

कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ; मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

April 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group