जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील रोझोदा (ता. रावेर ) येथे झालेला दुहेरी खुनामुळे अख्खा जिल्हा हादरला आहे. वृद्ध दांपत्य असलेले ओंकार पांडूरंग भारंबे [ वय ८० ] व त्यांची पत्नी सुमनबाई ओंकार भारंबे [ वय ७५ ] यांचा भावकीतील विश्वासू नातवाने पैशाच्या हव्यासापोटी धारदार सुरीने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे नेमका विश्वास तरी कोणावर ठेवावा हा प्रश्न या खून प्रकरणाने सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावनारा ठरला आहे. अशी माणुसकीसह नात्याला काळीमा फासणारी व प्रत्येकाचे हृदय हेलवणारी अमानवीय घटनेची रोझोद्याच्या पंचक्रोशीच्या इतिहासात नोंद नक्कीच करण्यासारखी आहे.
भारंबे सुशिक्षित परिवार :- ग्रामविकास अधिकारी म्हणून १९९२ ला सेवानिवृत्त झालेले ओंकार भारंबे यांना सुनील, संजय, लता व आशा अशी अपत्ये आहेत . संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असून सुनील पनवेल येथे महाराष्ट्र प्राधिकरण पाणी पुरवठा विभागात तर संजय ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागात आहेत. दोन्ही मुलींची लग्ने झालेली असल्याने त्या सासरी आहेत.
धाडस परेशचे :- यापूर्वी घडलेल्या खून प्रकरणात एका पेक्षा जास्त आरोपी सहभागी असल्याचे आपण ऐकले आहे. याच बरोबर बलात्कार करुन खून, जमीनीच्या वादातून खून, पैशे व दागिन्याची चोरी करुन घरातील लोकांचे तोंड, हातपाय बांधून चोरी अशा प्रकारच्या अनेक घटना आपण पाहिल्या ऐकल्या असतील . त्यात सहभागी आरोपी देखील एकापेक्षा जास्त नक्कीच असतील. मात्र रोझोदा येथील एवढ्या मोठ्या दुहेरी खून प्रकरणात आरोपी हा एकटाच असल्याने त्यात दोन्ही वयोवृध्दांचा निर्दयी खूनी करण्याच्या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून परेशच्या नको त्या धाडशीपणाच्या कमालीची खेदासह चर्चा सर्वत्र सुरु आहे.
खुनामागे परेशचे व्यसन कारणीभूत :- परेश हा इंजिनियरचा डिप्लोमाचे सेकंडीयर अँपियर शिक्षण पाहता सुशिक्षित, सुज्ञ आणि निर्णय क्षमता असणारा जाणकार विवाहीत तरुण आहे. शेती व्यवसाय करुनही परेशकडे पैसे नसायचे . त्यात त्याला दारु, सट्टा हे शौक पूर्ण करण्यासाठी ब-याच वेळा पैसा देखील नसायचा. व्यसनांच्या आहारी तो गेल्यानंतर आपली चैन पूर्ण करण्यासाठी जवळ पैसा मिळत नसे . पुणे येथे नोकरी करीत असताना एका वेळी पुणे रुमपार्टनरांच्या कपड्यांमधून पैशांची चोरी करण्यासारखी कृत्य घडले होते. ज्यांचे पैशे चोरीस गेले त्यांनी मात्र माणुसकीच्या नात्याने पोलिसांत तक्रार सुध्दा केली नाही.
व्यसनामुळे खुनी एकलकोंडा :- आपल्याकडून झालेल्या चुकीच्या कृत्याला घरातील वरिष्टांकडून वेळीच दखल घेतली जात नाही. उलट त्याऐवजी खतपाणी मिळत असेल, चुकीच्या कृत्यावर पांघरुण घातले जात असेल तर मग परिणाम तरी काय होईल? परेशचे एकंदरीत वागणे व स्वभाव पाहता त्याच्यापासून बरेच जवळचे मित्र देखील लांब गेले.
परेशच्या पत्नीची भ्रमनिराशा :- परेशचा विवाह अकोला जिल्ह्यातील माधुरी सोबत झाला. नऊ महिन्याचा मुलगा आहे.पत्नीसोबत सतत खटके उडत असल्याने तिला माहेरी पाठविण्यात आल्याचेही सांगितले जात असून परेशचे लग्नाची बोलणी सुरु असताना व लग्न ठरते वेळी मुलीकडील लोकांना परेशकडील लोकांकडून जी काही माहिती सांगण्यात आली.लग्नानंतर मात्र परेशची पत्नी माधुरीला तशा प्रकारची स्थिती नसल्याचे जाणवल्यामुळे तिची मोठ्या प्रमाणावर नाराजी होऊन चिडचिड वाढून भ्रमनिराश झाली. घरात विविध कारणांवरुन माधुरीचे भांडण होत असल्याने लग्न ठरताना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांच्यावर देखील माधुरीचा राग असल्याच्या चर्चा अलिकडे कानावर येऊ लागल्या आहेत. परेशनच्या लहानपणापासूनच्या संपूर्ण पार्श्वभूमिकाचा अभ्यास करता परेशवर ही वेळ कशी आली?कोणामुळे आली? या दोन प्रश्नांचा बारकाईने अभ्यास उत्तर नक्कीच मिळेल.
सुखी परिवाराला लागली नजर :- ओंकार भारंबे त्यांचा संपूर्ण परिवार सुशिक्षित विचारसरणीचे असल्यामुळे भावकी,समाजात,नातेवाईक आणि रोझोदा गावात त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे.दोघे मुले आणि दोघे मुलींचे संसार सुखात असल्याने कुठल्या प्रकारची चिंता नव्हती.वयोवृध्द असल्याने घरा बाहेर जाणे तसे कमीच.दोघही वृध्द पती-पत्नीचा मनमिळाऊ स्वभाव असल्याने कधी कोणासोबत यांची वाद किंवा भांडण झाल्याचे ऐकिवात नाही.त्यांना वर्तमानपत्र नियमितपणे वाचनाची सवय त्यांना होती.घराच्या ओट्यावर वाड्यातील काही मुले माणसे वर्तमानपत्र वाचणे व गप्पा करण्यासाठी बसलेले असत.यात परेश देखील असायचा.वृध्द आजी-आजोबांची कामे परेश करीत होता.मात्र ओंकार भारंबे यांच्या सुखी परिवाराला परेश भारंबेची नजर लागली आणि त्यातून खूनासारखी दुर्दैवी घटना घडली.
नात्याला काळीमा : – भावकीच्या नात्याने परेश हा ओंकार आजोबा व सुमन आजीचा एक प्रकारे विश्वासू नातू असल्याने काही कामे सुध्दा तो करुन देत होता.आजी-आजोबांचा असा निर्घृण खून करुन नातवाने नात्याला काळीमा फासल्याची अशी घटना रोझोदा गावाच्या पंचक्रोशीत प्रथमच घडल्याने अक्षरशः प्रत्येकाचे हृदय हेलवणारा हा प्रकार आहे.या घटनेमुळे कोणी कोणावर विश्वास कसा ठेवावा? हाच प्रश्न पंचक्रोशीतून प्रत्येकाच्या तोंडून व्यक्त केला जात आहे.
जगण्यापेक्षा मरण बरे :- मुलाने केलेल्या या निर्घृण खुनामुळे परेशच्या आई वडिलांच्या वेदना आणि मुलाने केलेली दुहेरी हत्त्या पाहता व आपल्या घरात आपल्या मुलाच्या हातात बेड्या घालून पोलीस आपल्यासमोर अशा क्षणी जन्मदात्यांची अवस्था जणू आताच्या आता धरतीमाता आपल्यासमोर फाटून त्यात उडी घ्यावी.असे जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटणे स्वाभाविकच. परेशसारख्या मुलास जन्म देण्यापेक्षा निपूत्र असलेले बरं अशी भावना त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण होणे सहाजीकच आहे.असे जरी असले तरी परेशने केलेल्या या अमानविय कृत्यास आई-वडील यांना दोष दिला जात आहे.
एकटा मुलगा :- परेशचे आई – वडील स्वभावाने खूप चांगले आहेत. खुशाल भारंबे यांना दोन मुले. त्यापैकी चंदन नावाचा २७ वर्षीय लहान मुलाचे हृदयविकाराने दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने परेश हा एकटाच मुलगा.
खरी संपती म्हणजे मुलांना सुसंस्कारी बनविणे :- संस्कार देण्यासाठी आई-वडील शिकलेले असायला हवे असेही नाही.ते निरक्षर असले तरी सुविचारी असणे महत्त्वाचे आहे.आपण जीवनात किती संपत्ती कमवली,किती शेती खरेदी केली,किती जमीन खरेदी केली आणि पैसा किती कमवला यापेक्षा आपल्या मुलांना आपण किती सुसंस्कारीत घडवले याला महत्व आहे.मात्र ब-याच ठिकाणी संपत्तीच्या हव्यासापोटी आई-वडील सुसंस्कार देण्यात कुठेतरी कमी पडतात.परिणामी मुले व्यसनासारख्या अपप्रवृत्तींकडे वळली जातात. अशामुळे मुलांच्या जीवनाची दशा आणि दिशा वेगळ्याच वळणार जाते.मुलांच्या जीवनाला चांगला मार्ग मिळण्यासाठी मुळात आई-वडील यांची साचेबध्द पध्दतीची जीवनशैली, कामगिरी व वागणूक चांगल्या प्रकारची असणे गरजेचे आहे.मुला मुलीच्या पहिल्याच चुकीत कानाखाली वाजवणारे पालक आज कमी प्रमाणात आढळतात.पाल्यांच्या चुकांना पांघरुण घालणाऱ्या आई वडिलांना मात्र जीवनात कधीतरी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. काही अंशी परेश भारंबे याची देखील अशीच स्थिती झाली असावी अशी शंका व्यक्त केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
परेशच्या म्हणण्यानुसार कर्ज बाजारीपणा तसेच दारु,सट्टा यांच्या आहारी गेल्याने त्याला पैशांची नेहमी गरज वाटायची.त्यामुळे केवळ पैशांसाठी भावकीच्या नात्याने लागणाऱ्या आजी-आजोबांचा खून करुन त्यांच्याच घरातील रोख रक्कम व दागिन्यांची चोरी केली.आपण केलेल्या कृत्याचा परिणाम पुढे काय होईल? याचा जराही विचार केला नाही.परेश भारंबेची आर्थिक स्थिती एवढी देखील हलाखीची नाही की जेणेकरुन कर्ज फेडता येणार नाही.सात-आठ बिघे केळी बागायतीची शेती.ट्रँक्टर आहे. आई-वडील घरातील कर्ते असताना कर्ज फेडीची जास्त काळजी त्यांना असताना.जे काही कर्ज असेल ते फेडण्याविषयी आई वडिलांसोबत चर्चा करुन कर्जाच्या रक्कमेचा सारासार विचार करुन थोडी शेती विकून त्यातून कर्जाची फेडही चांगल्या प्रकारे करता आली.परंतु परेशच्या एकंदरीत सर्व वागणूकीसह हालचालींचा अभ्यास करता कुठेतरी जाणवते कि त्याने कर्ज फेडण्याबाबत आई वडिलांसोबत कसलीच चर्चा न करता स्वतःच्या चैनी व व्यसनासाठी हे खून करुन सुमन यांच्या गळ्यातील मंगळसूत्र,कपाटातील सोनं व ५४३४० रुपयांची चोरी केली.
असा झाला खुनाचा उलगडा :- या प्रकरणाचा खरा उलगाडा झाला तो दुसऱ्या दिवशी १० सप्टेंबर रोजी सकाळी.ओंकार भारंबे यांच्या घरा शेजारीच कोरोना रुग्ण आढणून आल्याने तो परिसर कंटेनमेन्ट क्षेत्र म्हणून ठरविण्यात आला होता. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी दररोज आरोग्य तपासणीचे काम करतात त्यापध्दतीने आरोग्यसेवक डाँ.हारुन काझी हे ओंकार भारंबे आणि सुमन भारंबे यांच्या घरी आरोग्य तपासाणी करीता आले असता घराच्या दरवाजाची कडी आतून लावली नसल्याने दरवाजाला थोड ढकलल्यानंतर तो सहज उघडला गेला.डाँ.हारुन घरात प्रवेश करताच त्यांना ओंकार भारंबे हे खाटेवरुन खाली जमिनीवर रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे दिसताच क्षणी डाँ काझी खूप घाबरुन गेले.भांबरुन गेले.शरीर थरथर लागले.बघितलेल्या प्रकाराविषयीची माहिती जवळच्या लोकांना सांगितले. डाँ.हारु यांनी गावचे पोलीस पाटील वासुदेव हिवरे व उपसरपंच दीपक धांडे यांना दिली.यातच पाऊस पडत होता.
पोलिसांची कार्यतत्परता सिद्ध :- पोलीस पाटील घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर तत्काळ सावदा येथील सहायक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांना रोझोदा येथे फैजपूर रस्त्याकडील भारंबे वाड्यात घडलेल्या खून प्रकरणाविषयी सविस्तर माहिती देताच पोलिसांच्या ताफ्यासह राहूल वाघ यांनी भेट दिली व संपूर्ण घराची पाहणी करता घराच्या बैठक खोलीत खाटेवरील अंथरुण आणि खाटेच्या खाली ओंकार भारंबे यांचा धारदार सुरीने गळा चिरला.रक्त शरीरावर आणि आजूबाजूची जागा रक्त बंभाळ झालेली जाणवली तर स्वयंपाक खोलीत सुमन भारंबे यांचाही सुरीने गळा चिरलेला,डोक्यासह हात पोटाला देखील मार लागून आजूबाजूला रक्ताचा थरोळा पडलेला जाणवले.सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळवताच संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी धावून आली. मयत ओंकार व सुमनबाई यांना तिक्ष्ण सुरीने त्यांचे गळे चिरुन त्यांचे घरात जिवे ठार मारले.त्या अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशन भाग, ५ गुरन.३५ / २०२० भादवि.क ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यांचे गांभिर्य ओळखुन पोलीस अधिक्षक डाँ.पंजाबराव उगले.अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ घटना स्थळाला भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामात सुचना व मार्गदर्शन केले होते.सदर गुन्ह्याच्या तपास कामी एसडीपीओ गजानन राठोड,भुसावळ उपविभाग कार्यकार मुक्ताईनगर उपविभाग,पोलीस निरीक्षक बापू रोहोम स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव, सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि राहूल वाघ.पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार.पांडूरंग सपकाळे,विनोद पाटील,रिजवान पिंजारी,देवेंद्र पाटील,सुरेश अढायगे,संजीव चौधरी,मेहरबान तडवी,हेमराज भावसार,जगदिश पाटील,बाळू मराठे,विशाल खैरनार,योगेश सावळे,डाँग स्क्वाडचे शेषराव राठोड,मनोज पाटीर,फाँरेन्सिक युनिटमधील किरण चौधरी.योगेश वराडे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे,राजेंद्र पाटील,विजय पाटील,शरीफोद्दीन काझी,अनिल इंगळे,राजेश मेंढे,संजय हिवरकर,रमेश चौधरी,संतोष मायकल,युनूस शेख,किशोर राठोड,नंदलाल पाटील,अरुण राजपूत,राहूल पाटील,नरेंद्र वारुळे, अशांचे पथके वरील गुन्ह्यांचे तपास कामी पोलीस अधिक्षक डाँ.पंजाबराव उगले यांनी स्थापन केले होते.
९ तासात लावला घटनेचा छडा :- घडलेल्या दुहेरी खूनाची बातमी परिसरात वा-यासारखी पोहचली.गावातील,.शेतात गेलेले आपली कामे सोडून,आजूबाजूच्या गावातील असे शेकडों अबालवृध्दांची घटनास्थळी तोबा गर्दी जमली.कोणी रस्त्यावर,गल्ली बोळात,घरांच्या छतांवर तर कोणी मिळेल त्या जागेवरुन सात-आठ तास भुकल्यापोटी घटनाक्रमांची पाहणी करीत दुःख व्यक्त करीत होते.
तपास यंत्रणा लागली कामाला:- झालेल्या हत्त्याकांड प्रकरणाचा सारासार विचार करता.हत्त्या होण्याची कारणमिमांसा पाहता पोलिसांनी काही मुद्यांसह प्रश्नावलीच्या माध्यमातून तपास करण्याच्या कामी विविध पथकातील पोलिसांना कामाला लावले.अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावून घटनेचा कसून छडा लावला जात होता.काहींची एकंदरीत वागणूक व तेथील हालचाल पाहता संशयाच्या दिशेने तपास चक्र सुरु झाले. पोलिसांच्या चाणाक्ष आणि आपल्या विशिष्ट शैलीने उलट-सुलट चौकशी करीत ख-या आरोपीपर्यंत पोहचण्याच्या गुप्त हाचलांना वेग आला होता.प्रत्यक्ष हजर असणारे शेकडों नागरिक मात्र पोलिसांची कार्यप्रणाली पाहण्यात दंग झाले.अनेक जण तर वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क करु लागले.श्वान पथक देखील आपल्या पध्दतीने प्रयत्न करीत होते.संपूर्ण पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून आरोपीच्या शोधात अनेक कोडे उलगडत होती.पोलीस यंत्रणेची कामगिरी काय असते याची प्रत्यक्ष अनुभव रोझोदा ग्रामस्थांनी अनुभवला.
श्वान पथक काही अंतरापर्यंत जात होते.पण खरा आरोपी हाती लागत नव्हता.दिवसभर सर्व प्रयत्न करुन यश मिळत नव्हते.काळोख पडला.एका बाजूला घटनास्थळी तपास सुरु.तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालायात गावातील दारु विक्री करणारे,वीज कर्मचारी,केबल चालक,पावरी जमातीचा परिवार,ओंकार भारंबे यांच्या घराच्या ओट्यावर बसणा-या आठ-नऊ जणांना,घराच्या जवळपासच्या अशा अनेकांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. तपास कामाला गती मिळत गेली.अनेक प्रकारचे धागे दारे घटनाक्रमाशी मिळते जुळते होऊ लागले.कुठेतरी आशेचा किरण पोलिसांच्या हाती लागत गेला.
पाणी पिण्याचा केला बहाणा :- रोझोदा येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ओंकार पांडूरंग भारंबे [ वय८० ] व पत्नी सुमनबाई ओंकार भारंबे [ वय ७५ ] यांची भावकीच्या नात्यातील नातू परेश खुशाल भारंबे [ वय ३२] याने दि.९ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता पाणी पिण्याच्या कारण सांगून घरात घरात प्रवेश केला. सुमनबाई या पाणी आणण्याकरीता स्वयंपाक खोली गेल्या असता त्यांच्या मागे जाऊन सुमनबाई यांच्या गळ्यावर धारदार सुरीने तीन-चार वार केल्याने त्या जमिनीवर पडल्या.सुमन यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन बैठक खोलीत खाटवर बसलेल्या ओंकार भारंबे यांच्या गळ्यावर सुरीने वार करुन त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर कापडी हँन्डग्लोज हातात घालून कपाटीतील ५४३४० रुपये व बांगड्या घेऊन परेश स्वयंपाक खोलीतून वाड्यात पसार झाला. चोरीचे ऐवज आपल्या वाड्यातील माळ्यावर त्याने प्लँस्टीकच्या पिशवीत लपवले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने हत्त्या करताना वापरलेले पँन्ट-टी शर्ट,सुरी, हात रुमाल व हँन्डग्लोज जवळील नाल्यात लपवून घरी गेल्याची पोलिसांकडे कबुली दिली.
परेशच्या बुरख्याचा पर्दाफाश :- हत्त्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डाँ.काझी यांनी ओंकार भारंबे यांना रक्ताच्या थरोळ्यात पाहिल्यानंतर ज्या घडामोडी घडत होत्या.त्या वेळेपासून परेश स्वतः हजर होता.विशेष म्हणजे परेशने तिरडी आणली,खुर्च्या आणल्या,किराणा सामान आणून दिला. मात्र नऊ तासातच हाच परेश आरोपीच्या जाळ्यात अडकला गेला.अशा प्रकारे परेशचा सफेद बुरखा पोलिसांनी फाडला. खूनाची कबुली खून करणाऱ्याची तपासणी वेगवेगळ्या मार्गाने सुरु होती.खून झाला त्यादिवशी कुठे झोपला होता?असा प्रश्न पोलिसांनी परेशला केला.त्यांनतर परेशच्या वडिलांना बोलावून खून झाला त्यादिवशी तुम्ही कुठे? व परेश कुठे झोपला होता?याविषयी प्रश्न पोलिसांनी विचारले असता.मुलगा आणि वडिलांच्या सांगण्यात पोलिसांना विसंगती आढळल्याने तसेच परेशच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलल्याने परेशवर पोलिसांचा संशय अधिक बळावला.पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच परेशने खूनाची कबूली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोलिसांना दिली.
मुद्देमाल व हत्यार जप्त :- ग्रामपंचायत कार्यालयातून २५ – ३० पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्यातून खूनी परेशला सावदा पोलीस उपनिरीक्षक राहूल वाघ यांच्यासह फैजपूर रस्त्याने असलेल्या स्वतःच्या वाड्यामधील माळ्यावरील पांढऱ्या पाण्याच्या टाकीजवळ प्लँस्टीकच्या पिशवीत ठेवलेला मुद्देमाल काढून दिला नंतर हत्त्या करते वेळी घातलेले कपडे , सुरी,कापडाचे हँन्डग्लाँज,हातरुमाल प्लाँटच्या पुढील फैजपूर रस्त्याने ठेवलेल्या ठिकाणी जाऊन काढून दिले.त्यानंतर परेशची रवानगी सावदा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर सर्व पोलीस तपास यंत्रणेने निष्केचा श्वास सोडला.केवळ नऊ तासांच्या आत रोझोदा येथील दुहेरी खून प्रकरणातील ख-या सुत्रधार आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाल्यामुळे सर्व पोलीस तपास यंत्रणेसह सावदा येथील सहायक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांचे परिसरातील जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे. रावेर येथील न्यायालायाकडून परेशला पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली.या दरम्यान त्याच्याकडून हत्त्या प्रकरणाबाबत पोलिसांना अजून खूपकाही माहिती तपास घेणे बाकी आहे.दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी हातात बेड्या घालून रोझोदा येथे आणले गेले.फैजपूर रस्त्याजवळील ज्या प्लाँटमधून परेशने प्लँस्टीकच्या पिशवीत असलेला मुद्देमाल काढून दिला त्याच ठिकाणाजवळ त्याला पुन्हा आणले असता प्लँस्टीक पिशवी लपवून ठेवालेला मुद्देमाल मिळाला तसेच पुन्हा फैजपूर रस्त्याने त्याला पोलीस घेऊन गेले.यानंतर परेशच्या घरी त्याला पोलीस बंदोबस्तात आणले गेले.ज्या घरात त्याने हत्त्याकांड केले त्याठिकाणी आणून कशा प्रकारे दुहेरी हत्त्या केली याविषयी सरकारी साक्षिदारांसमोर सविस्तर माहिती दिली. आपल्या गावात,घरी अन् घराजवळ आपल्या भावकीतील,ओळखीच्या जनतेसमोर आपल्या हातात बेड्या घालून आपल्याला फिरवले जात आहे.याबद्दल परेशच्या चेहऱ्यावर जराही पश्चात्ताप किंवा दुःखाच्या भावना जाणवत नव्हत्या.
आई-बाबांविना आम्ही तर झालो पोरके :- कुटुंबीयांना आप्तेष्टांसह मित्र परिवाराच्या माध्यमातून मोबाईल द्वारा जेव्हा कळविले असेल तेव्हा आई-बाबा यांची तब्बेत जास्त असल्याचे सांगण्याचा प्रयत्न जरी झाला असला आणि घडलेल्या दुर्दैवी दुहेरी हत्त्या प्रकाराबाबतची सत्यता मुंबईसारख्या शेकडो किलोमीटरवर असणाऱ्या मुलांपासून गावी येईपर्यंत कितीही गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कुटुंबियांना कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने सातत्याने वाजणा-या फोनमुळे वास्तव स्थिती विषयी जाणीव व्हायला वेळ मात्र लागत नाही. फोनवरुन आई-बाबांच्या एकत्रित निधनाची [ हत्त्या होणे ] अशी वार्ता कानी जेव्हा पडली असणार तेव्हा या अख्या कुटुंबाची काय अवस्था झाली असणार? याची आपण कल्पना आपण करु शकतो.कुटुंबासमोर कसे आणि किती आभाळ फाटले असेल…काय वाटले असेल त्या जीवांना…प्रत्येकाच्या उरात कशी धड्धड् झाली असणार…शरीराला जणू पंख फुटून भरारी घेत केव्हा रोझोदा येथे पोहचतो अन् आई-बाबांना डोळे भरुन पाहतो…! अशी अवस्था कुटुंबियांची झाली असणार. आपल्या आई-बाबांची तिक्ष्ण शस्त्राने गळा चिरुन निर्घृण हत्त्या केल्याची खबर कुटुंबियांपर्यंत गेल्यानंतर “माझ्या आई-बाबांनी कोणाच असं नुकसान केले,कोणता गुन्हा केला कि माझ्या आई-बाबांची अशी निर्घृणपणे हत्त्या केली” असा प्रत्येकाच्या अंर्तदाहतील टाहो फोडून ढायढाय रडण्यासारखी अवस्था होणे स्वाभाविकच.