TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपले पोलीस संकल्पनेतंर्गत प्राप्त नव्या वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होणार : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनेक पोलीस कर्मचारी बाधित झाले तर काही मृत्यूमुखी पडले. मात्र त्यानंतरही पोलीस दलाने २४ तास सेवा बजावली. त्याचीच फलश्रुती म्हणून जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. शासनाने नागरिकांच्या तक्रार निरसनासाठी ११२ ही प्रणाली कार्यान्वित केल्याने तक्रारीचे वेळीच निरसन व्हावे यासाठी वाहनांची आवश्यकता होती. तक्रार निरसनासाठी या वाहनांमुळे पोलीस कर्मचार्‍यांना तत्काळ घटनास्थळी पोहचता येणार असून पोलीस दलाच्या वाहनांचा बर्‍यापैकी प्रश्‍न सुटला आहे. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेही सहकार्य लाभले असून या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

आपले पोलीस संकल्पनेच्या अंतर्गत दुसर्‍या टप्प्यात आज पोलीस मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ चारचाकी आणि ३८ दुचाकी वाहने जळगाव जिल्हा पोलीस दलाला सुपर्द करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १४ बोलेरो मिळाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात १५ चारचाकी अशा आता एकूण २९ चारचाकी व ३८ दुचाकी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नगरसेवक अमर जैन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाहनाला नारळ वाढवून तसेच पूजन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सर्व चारचाकी व दुचाकी वाहने पथसंचलनासाठी शहरात मार्गस्थ झाली. कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुली मार्गे स्वातंत्र्य चौक व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात संबंधित वाहने पथसंचलनानंतर दाखल झाली. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करून २३ जानेवारी २०२१ रोजी २ कोटी ३२ लाख ४१ हजार ७१ रूपयांची तरतूद केली होती. कोविडच्या आपत्तीमुळे हा निधी एकदा देण्यात आला नसून याचे दोन टप्पे करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९९ लाख ३२ हजार रूपयांच्या वाहने खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. यातून जिल्हा पोलीस दलास १४ बोलेरो वाहने प्रदान करण्यात आली होती. आता दुसर्‍या टप्प्यासाठी उर्वरित १ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलाकडे वितरीत करण्यात आला होता. यातून महेंद्रा बोलेरो बी-४ बीएसव्हीआय या मॉडेलची १५ वाहने आणि ३८ होंडा शाईन दुचाकी गाड्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते जिल्हा पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली असून या वाहनांमुळे पोलीस दलाला मोठी मदत होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले.

पोलीस मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरिक्षक समीर मोहिते यांनी कार्यक्रमाचे नियोेजन केले. सूत्रसंचालन पोलीस नाईक अमित माळी यांनी तर आभारप्रदर्शन पोलीस गृह विभागाचे उपअधीक्षक भास्करराव डेरे यांनी केेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

अमळनेर येथील चोरीचा संशयित आरोपी शिंदखेडा येथून ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॅन्जो गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात चालकविरुद्ध तक्रार दाखल !

January 23, 2022

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022

ओटीपी विचारून तरुणीची फसवणूक ; एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

March 24, 2022

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group