बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी उत्पादीत कडधान्य, मका, कांदा, मिरची इत्यादी मालाची खरेदी विक्री करण्यासाठी मलकापूर व इतर बाजार समित्यांच्या धर्तीवर व्यापारी व शेतकरी यांना प्रोत्साहीत करुन सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून प्रशासकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठी बाजार समिती असून तीन तालुक्यातील परिसरात विस्तार आहे. बोदवड तालुक्यात बोदवड व जामठी येथे खरेदी विक्री केंद्र असून मुक्ताईनगर व कुऱ्हा काकोडा येथे खरेदी विक्री केंद्र आहेत तसेच भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथे ही खरेदी विक्री केंद्र असून सुद्धा शेतकरी बांधव यांच्या शेती मालाची कोणत्याही प्रकारची बाजार समिती आवारात खरेदी विक्री केली जात नाही.
सर्वात मोठी बाजार समिती असून सुद्धा शेतकरी व व्यापारी यांना पाहीजे त्या प्रमाणात लाभ मिळत नाही.बोदवड येथील बाजार समिती केंद्रासह सर्व केंद्रावर शेतीमालाची खरेदी विक्री होणेसाठी मलकापूर व इतर बाजार समितीच्या धर्तीवर्ती सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात याव्या शेतकरी बांधव व व्यापारी बांधव यांना विश्वासात घेवून त्यांच्या अडचणी समजवून घेण्यात याव्या त्यांना त्यांच्या सोईनुसार सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात याव्यात.
तसेच मागील काळामध्ये बोदवड व जामठी येथील बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात ओली व सुकी लाल मिरचीची लिलाव पद्धतीने खरेदी विक्री केली जात असे. त्यामुळे शेतकरी यांना चांगला मोबदलाही मिळत असे.व व्यापारी बांधव यांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असे.तसेच बाजार समितीचे लायसन्स धारक हमाल व मापाडी बांधवानाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असे मात्र बाजार समितीने खरेदी विक्री बंद केल्याने आज हमाल व मापाडी बांधव यांचेवर्ती बेरोजगाराची वेळ आल्यामुळे त्यांच्यावर्ती अवलंबुन असलेल्या त्यांच्या परिवारावर्ती सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. याचा विचार ही बाजार समितीने करायला हवा.
बाजार समितीच्या व्यवस्थापन हेतु पुरस्कर बाजार समिती परिसरात शेती उत्पादीत मालाचे खरेदी विक्री व्यवहार हळुहळु बंद केलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, तसेच हमाल मापाडी यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यास सर्वस्वी बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार आहे.विकी मोठ्या प्रमाणात भाव मिळत असे व व्यापारी बांधव यांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असे.तसेच बाजार समितीचे लायसन्स धारक हमाल व मापाडी बांधवानाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असे मात्र बाजार समितीने खरेदी विक्री बंद केल्याने आज हमाल व मापाडी बांधव यांचेवर बेरोजगाराची वेळ आल्यामुळे त्यांच्यावरती अवलंबुन असलेल्या त्यांच्या परिवारावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. याचा विचार ही बाजार समितीने करायला हवा.
बाजार समितीच्या व्यवस्थापनाने हेतूपूरस्पर बाजार समिती परिसरात शेती उत्पादीत मालाचे खरेदी विक्री व्यवहार हळुहळु बंद केलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, तसेच हमाल मापाडी यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यास सर्वस्वी बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ जबाबदार आहे. त्या साठी शेतीमालाची खरेदी विक्री होणेसाठी मलकापूर व इतर बाजार समितीच्या धर्तीवर्ती सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी आणि नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, नगरसेवक राजेश नानवाणी,शहर प्रमुख राहुल शर्मा, रवींद्र बोदडे, गोपाळ पाटील, दिनेश माळी, नितीन चव्हाण, जितेंद्र पाटील, प्रितेश जैन, संजू वंजारी, राजू पाटील, राजेश कदम, शे. युनूस शे. हसन, अजय पाटील, अजय शेळके, भिकू रेंगे, विलास काजळे, रमेश गावंडे. यांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.