TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गरजूंच्या चेहर्‍यांवरील आनंदातूनच खरे समाधान : प्रतापराव पाटील

वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे धरणगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना मदतीचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे अनेकांना अडचणी आल्या असून या पार्श्‍वभूमिवर वर्ल्ड व्हिजन इंडिया यांनी केलेले समाजकार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे. या संस्थेने कोरोनाच्या काळात विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदत केली असून भविष्यातही या संस्थेने अशाच प्रकारे गरजूंच्या पाठीशी उभे रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रतापराव पाटील आणि अनिल पाटील यांनी याप्रसंगी ५१ हजार रूपयांची मदत जाहीर केली. जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहर्‍यांवरील आनंदातून आपल्याला खरे समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेतर्फे पाळधी येथे गरजूंना मदत वितरण करतांना ते बोलत होते.

वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था समाजातल्या तळागाळातील जनतेच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे धरणगाव तालुक्यातील गरजू जनतेला विविधांगी मदत प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नितीन देवरे, एकात्मक बालविकास अधिकारी संजय धनगर आदी मान्यवरांंची उपस्थिती होती.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

प्रास्ताविकात वर्ड व्हिजनचे अनिल बल्लूरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वंचित कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी व शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना देखील सर्वोतोपरी मदत देण्याचे काम वर्ड व्हिजन करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय बागुल यांनी केले तर आभार वर्ड व्हिजनचे रतीलाल वळवी यांनी मानले.

या वर्षी धरणगाव तालुक्यात १ कोटी ७१ लाखाचा निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मागणीनुसार मंजूर केला असून यातील २३ गावांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात २ – ३ गावातील पात्र लाभार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , तहसीलदार नितीनकुमार देवरे व वर्ड व्हिजनचे अनिल बल्लूरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी टहाकळी बाल ग्रुप, व इतर विद्यार्थांनी गीते व बाल नृत्य सादर उपस्थितांची मने जिंकली त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

वर्ल्ड व्हिजन इंडिया कंपनीने धरणगाव तालुक्यातील ७५० कुटुंबांना प्रत्येकील ३५०० रूपयांचे असे एकूण २६ लक्ष २५ हजार रूपयांचे धान्य वाटप केले. ११९५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ७५० रूपयांचे असे एकूण ९ लक्ष २५ हजार रूपयांचे धान्य वाटप करण्यात आले. ६३ कुटुंबांना प्रत्येकी १५७५ रूपये मूल्य असणार्‍या एकूण एक लक्ष रूपयांचे सौर कंदील प्रदान करण्यात आले. अडीचशे कुपोषीत बालकांसाठी प्रत्येकी तीन हजार असे एकूण साडे सात लक्ष मूल्य असणार्‍या धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील २० अंगणवाड्यांना एक लक्ष रूपयांच्या बेबी चेअर्सचे वाटप करण्यात आले. याच्या जोडीला १२५० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ४६० रूपये मूल्य असणारा दप्तर, बॅग व डबा देण्यात आला असून यांचे एकत्रीत मूल्य ११ लक्ष ५० हजार इतके होते. ८४५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ७७५ रूपये मूल्य असणार्‍या एकूण ११ लक्ष ५० हजार रूपयांच्या खेळण्यांचे वाटप करण्यात आले. तर, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तालुक्यात वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून ही रोपे देखील वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे देण्यात येत आहेत.

यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे,वर्ड व्हिजनचे मॅनेजर अनिल बल्लूरकर, विजय राऊत, रतीलाल वळवी, एकात्मिक बाळ विकास अधिकारी संजय धनगर, माजी सभापती अनिल पाटील, प्रकाश पाटील, विजेश पवार, शिक्षक सेनेचे नाना पाटील, एकलग्न, वराड, पोखरी तांडा, फुलपाट, तहकळी, वंजारी खापाट, जंभोरा, बिलखेडे भोणे, सार्वे पिंपळे, साकरे, कंडारी, निशाणे येथील सरपंच, पोलीस पाटील व पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

महिलेच्या नावाने अश्लील मॅसेज पाठविणारा पोलीस कोठडीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. गुलाबराव पाटील

June 11, 2022

‘जर ईडीचे बोलावणे आले तर माझी मुलगी आत्महत्या करेल’ ; आव्हाडांच्या वक्तव्यानं खळबळ

March 24, 2022

दिल्ली कोर्टात भरदिवसा फायरिंग, वकिलाच्या वेशात आले गँगस्टर ; कुख्यात गुंड गोगी ठार

September 24, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : अटकेतील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group