TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

ऑक्टोंबर २०२४ पासून सुरु होता प्रकार,सायबर पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
June 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मुलीला जेईईसाठी ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेकडून दीड लाख रुपये उकळून कोणताही क्लास घेतला नाही. त्यानंतर अन्य सायबर ठगांनी ती रक्कम परत मिळवून देतो असे म्हणत त्या महिलेकडून २१ लाख ६५ लाख रुपये उकळून महिलेची २२ लाख ७५ हजारात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना ऑक्टोंबर २०२४ ते दि. २ जून २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीएसएफमधील निवृत्त जवान विनोद राजाराम सोनार (रा. अमळनेर) यांच्या पत्नी ज्योती विनोद सोनार (वय ४१) या त्यांच्या मुलीला जेईईसाठी ऑनलाईन क्लास लावण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होत्या. त्या दरम्यान जून २०२४ मध्ये ‘आकाश बायजूस’ नावाने सचिन राठोड (रा. पुणे) याने त्यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना जेईईच्या ऑनलाईन क्लासबद्दल माहिती दिली. त्यासाठी १ लाख ४५ हजार रुपये फी असून ४ हजार ६०० रुपये प्रमाणे हप्त्याने पैसे भरावे लागतील, असेही सांगितले. त्यानुसार दि. १२ जून रोजी महिलेकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून २० हजार रुपये युपीआयद्वारे घेतले होते.

READ ALSO

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

पैसे घेवून क्लास अन् पुस्तकेही दिली नाही

त्यानंतर दि. २ जुलै २०२४ रोजी राठोड याने पुस्तकांच्या नावाने ८ हजार रुपये घेतल्यानंतर दि. २९ ऑक्टोबर २०२४ ते दि. १८ डिसेंबर २०२५ या दरम्यान हप्ता हप्त्याने एकूण १ लाख ९ हजार ५०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. मात्र पुस्तकेही दिली नाही व क्लासही घेतले नाही. त्यानंतर संबंधितांशी महिलेने वारंवार. संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद ही देत नव्हते.

पैसे घेतल्यानंतर प्रतिसाद देणे केले बंद

क्लाससाठी भरलेली रक्कम गेल्यानंतर महिलेची मुलगी टेलिग्राम अॅप्लीकेशनवर आकाश बायजूस चॅनलवर माहिती घेत असताना तेथे तिची गणेश (रा. दिल्ली) नामक व्यक्तीशी ओळख झाली. त्याला तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तुझे पैसे दुप्पट करून देईल, अशी ग्वाही दिली. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या कारणांनी महिलेकडून २ लाख ९३ हजार ९०० रुपये ऑनलाईन स्वीकारल्यानंतर त्याने देखील प्रतिसाद देणे बंद केले. पैसे परत न मिळाल्याने पोलिसात तक्रार

जेईईच्या क्लासकरीता फी च्या नावाखाली भरलेली रक्कम व अन्य चौघांनी वेगवेगळ्या कारणाने उकळलेली रक्कम परत न मिळाल्याने ज्योती सोनार यांनी दि. २३ जून रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सचिन राठोड, शरव पवार, गणेश, अनूज व प्रदीपकुमान मीना नावाच्या व्यक्तींविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

तोतया सायबर अधिकाऱ्याने उकळले १९ लाख

गणेश नामक व्यक्तीच्या मित्र अनुज याच्या क्रमांकावरून केलेल्या मोबाईलवर महिलेने संपर्क साधला. त्याने दिल्ली सायबर क्राईमध्ये माझी ओळख असल्याचे सांगून सायबर अधिकारी प्रदीप कुमार मीना नावाच्या व्यक्तीशी बोलणे करून दिले. त्या अधिकाऱ्याने तक्रार नोंदणीसाठी २ हजार, बँक व्हेरिफिकेशनसाठी ४ हजार, विड्रॉल चार्जेससाठी ३० हजार, ट्रान्सफर प्रोसेसिंग फी म्हणून ७ हजार ३६६ घेतले. त्यानंतरही ३१ डिसेंबर २०२५ ते २ जून २०२६ या दरम्यान १८ लाख ७१ हजार ७३७रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman looking for online JEE classes duped of ₹23 lakh

Related Posts

क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल

March 9, 2021

पाचोरा पोलिस ठाण्याच्या फौजदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा !

December 2, 2023

पिंप्री विकासो चेअरमनपदी ईश्वर बच्छाव तर व्हाईस चेअरमनपदी छोटू पाटील यांची एकमताने निवड

June 18, 2022

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group