
जळगाव (प्रतिनिधी) – रस्त्याने जात असलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळून जात होते. मात्र आकाशवाणी चौकात कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतुक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरलेल्या मोबाईलसह दुचाकी हस्तगत करण्यात आली. दरम्यान, चोरट्यांना त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
शहरातील आकाशवाणी चौकातून एक महिला रस्त्याने जात होती. दरम्यान त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून ते दुचाकी पळून जात होते. ही घटना सहाय्यक फौजदार दीपक बनसोडे व अंमलदार भूषण मोरे असलेल्या पोलीस अंमलदारांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पळून जात असलेल्या चोरट्यांची दुचाकी अडवून संशयित अमोल एकनाथ बोदडे (वय ३०, रा. रामनगर, महाबळ) व तौसिफ बेग खलील बेग (वय ३२, रा. समता नगर) या दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल
कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान राखत पळून जाणाऱ्या चोरट्यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, या पोलीस अंमलदार दीपक बनसोडे व भूषण मोरे या दोघांचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी वाहतुक पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेन्दाम है उपस्थित होते.
पळून जाण्यापुर्वी घेतले ताब्यात
वाहतुक पोलिसांनी दोघ चोरट्यांना पळून जाण्यापुर्वी ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व (एमएच १९, ईटी ८३६७) क्रमांकाची दुचाकी हस्तगत केली. तो मोबाईल पोलिसांनी पीडितेला परत देत त्या दोघ चोरट्यांना कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.
















