TheClearNews.Com
Thursday, June 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२६८१ वाढली !

निवडणूक विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची फलश्रुती ; पुरूषांबरोबर तृतीयपंथी मतदार ही वाढले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदार संख्या होती. २७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांतील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मतदार नोंदणी कार्यक्रमातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२६८१ ने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ७६७ मतदार झाले आहेत‌. तर याच कालावधीत पुरूष मतदारांमध्ये ४४२८० ने वाढ झाली आहे. पुरूष मतदारांमागे महिला मतदारांची सरासरीत ४ ने वाढ होत ९२१ वरून ९२५ इतकी सरासरी झाली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मागील काही महिन्यात महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन केले. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात मतदार नोंदणी बाबत जनजागृती करण्यात आली‌. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुर्गम अशा सातपुड्याच्या आदिवासी भागात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नवमतदारांसाठी शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर कालावधीत ग्रामसभांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात १८ वर्षापूढील नवमतदारांसाठी नोव्हेंबर २०२३ या महिन्यात ४ विशेष शिबीरे घेण्यात आली. १८ व १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर विद्यार्थीनींनी, महिला, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मतदार नोंदणी वाढावी यासाठी रॅली, पोस्टर, बॅनर व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार -प्रसार करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेर मध्ये महिला मतदार सर्वाधिक वाढले

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेर शहरात सर्वाधिक महिला मतदार वाढले आहेत. जळगाव शहरात २७९२ , भुसावळ २५२८, एरंडोल २२२४, चाळीसगाव २३२२ व जामनेर २२१८ महिला मतदार वाढले आहेत. याखालोखाल चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, पाचोरा व मुक्ताईनगर या मतदार संघाचा नंबर लागतो.‌

तृतीयपंथी मतदार वाढले

जिल्ह्यात २ व‌ ३ डिसेंबर रोजी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबीरे घेण्यात आली. यामुळे तृतीयपंथीय मतदारांची संख्याही ८ मतदारांने वाढली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यात १२३ तृतीयपंथीय मतदार होते. आता १३१ तृतीयपंथीय मतदार आहेत. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव शहर व चाळीसगाव मध्ये सर्वाधिक तृतीयपंथीय मतदार आहेत.

“राज्यात नऊ डिसेंबरला मतदार नोंदणी मुदत संपली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त नवमतदारांनी ऑफलाईन किंवा व्होटर रजिस्टर अॅपच्या मदतीने लवकरात लवकर नोंदणी करावी” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
Next Post

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ऋतिक कोतकरला सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी : पावसाने केला घात, स्मशानभूमीचे छत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

January 3, 2021

डी-मार्ट परिसरातून एकाची दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

December 19, 2021

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं लोकापर्ण, शरद पवार, उद्धव-राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात लावणार हजेरी

January 23, 2021

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पहूर पोलिसात गुन्हा !

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group