TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव ; जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेचा समारोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा आज (ता. ३०) समारोप झाला. समारोप सत्रात देशभरातील २१ शेतकऱ्यांचा अमित उद्यान रत्न पुरस्कार – २०२३ ने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बिजय कुमार उपस्थितीत होते. त्यांच्यासोबत चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, सौ. बिमला सिंग, अमरेंदर सिंग, डॉ. बिर पाल सिंग, डॉ. एस. के. मल्होत्रा, डॉ. जे. एस., परिहार, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिद अमितसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अॅवार्ड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. त्यात त्यांनी १५ वी स्वदेशी जागृती संगोष्टी व अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशनविषयी माहिती दिली. डॉ. जे.एस. परिहार यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. प्रज्योत नलिनी, डॉ. व्ही. आर. सुब्रम्हणिअम यांनी केले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

डॉ. एच. पी. सिंग यांनी राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेच्या तीन दिवसांच्या कामकाजाचे निष्कर्ष शेतकरी, अभ्यास व शास्त्रज्ञांसमोर मांडलेत. कृषी क्षेत्रात प्रिसीजींग फार्मिग किती महत्त्वाचे यावर त्यांनी प्रकाश टाकला. वारंवार होणाऱ्या वातारणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिकांचेही खूप नुकसान होत आहे. यासाठी संशोधकांनी नॅनो तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. यासाठी संशोधकांनी कमीत कमी कालावधीत संशोधनाला चालना दिले पाहिजे. शेतातील मुख्य पिकाची मूल्यवृद्धी करून नवीन उत्पादनांची श्रृखंला शोधली पाहिजे. शेतातील टाकाऊपासून काही टिकाऊ उत्पादन घेता येऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होईल अशा शिफारशी समोर आल्यात. प्रिसीजन मॅकेनिझम महत्त्वाचे असून शेतकऱ्यांमध्ये त्यादृष्टीने जागृता आणणे. जे पर्यावरण, जमीन, पाणी आपल्याला मिळाले त्यापेक्षाही अधिक सुपिक जमिन, चांगले पर्यावरण पुढच्या पिढीकडे हस्तांरीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची चर्चा समोर आली.

वातावरणांच्या बदलांमध्ये जे वाण टिकेल अशा उच्च गुणवत्तेच्या बियाणांची निर्मीती करणे. भौगौलिक मानांकनासह व्हायरस नियंत्रण ठेवण्यासाठी माहितीचे आदान प्रदान करण्याची सक्षम यंत्रणा उभारणे. शेतमाल काढणी पश्चात व्यवस्थापनावर सकारात्मक यंत्रसामुग्रीचा विचार करणे यातून निर्यातीच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय मानांकनांसह शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे अशा विविध विषयांवर तिन दिवसीय राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये विचारमंथन झाल्याचे डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले. डॉ. एस. के. मल्होत्रा यांनीही राष्ट्रीय फलोद्यान परिषदे दिशादर्शक ठरली असून आलेल्या शिफारशींवर काम करणार असल्याचे सांगितले. अमेंदर सिंग, बिमला सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. बिजय कुमार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सकस आहारासाठी निकोप पर्यावरण हवे. यातून नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. अतिरिक्त फवारणी, खतं, पाणी न देता कमी वेळेत, कमी संसाधनांमध्ये उत्कृष्ट शेती केली पाहिजे. ठिबक तंत्रज्ञानातून पाणी बचत होतच यातूनच वॉटर सोल्युबल खते आवश्यक मात्रांमध्येच दिली पाहिजे. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीचे सुरू असलेले कार्याचे कौतूकही डॉ. बिजय कुमार यांनी केले.

अमित सिंग उद्यान रत्न पुरस्कारार्थी
शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार मानसन्मान केले जातात. त्यात देशभरातील खालील शेतकरी व शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. सोनू निगम कुमार, आनंद कुमार ठाकूर,रामकिशोर सिंग मुजफरपूर, नारायण महातो रोसेरा बिहार, दत्तात्रय विठ्ठल माळी सोलापूर, ईश्वर सुदाम पाटील नंदुरबार, जगदीश बाबुलाल जाठ बडवाणी मध्यप्रदेश, रितेश प्रकाश पाटील बुऱ्हाणपूर, राज गोंडा पाटील सांगली, सौ. राजेश्री दिपक पाटील जळगाव, नारायण शशिकांत चौधरी यावल, रामदास त्र्यंबक पाटील जळगाव, मनोज जानरावजी जवांजल नागपूर, मयूरभाई कानाभाई पिंप्रोतर सुरेंद्रनगर गुजराथ, धर्मेंद्र सिंह विरेंद्रसिंह चौहाण नर्मदा गुजराथ, अण्णासाहेब हरीभाऊ माळी चांदवड नाशिक, राजू रामदास पाटील जामनेर, ईरण्णा डी. हल्ली बिजापूर, पुर्णा चेरल्ला विकराबाद तेलंगणा, अभिषेक आनंद सितामढी बिहार, जयपाल सिंग पानिपत हरियाणा यांचा अमित सिंग उद्यान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, रोख पारितोषीक असे होते. दरम्यान शेतकऱ्यांची क्विज स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राम किशोर बिहार, अनिल सपकाळे जळगाव, मनोज जवांजळ नागपूर विजयी झालेत त्यांचाही गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सादरीकरण केल्याने डॉ. ए. आर. मेंढे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सुमरेसिंग पाटील, डॉ. आर. सुधा, डॉ. स्वाती, डॉ. अनिल चौधरी, डॉ. शर्मिष्ठा नायक, डॉ. बी. डी. जडे, डॉ. रश्मी कुमार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना पोलीस कोठडी !

March 27, 2021

चालकाचे नियंत्रण सुटले, कार ओढ्यात कोसळली ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू !

October 31, 2023

बीएचआर घोटाळा : १२८ ठेवीदरांच्या मूळ पावत्या परत करण्याचे न्यायालयाने आदेश !

August 28, 2022

शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group