पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातून बसमध्ये चढणाऱ्या तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील पोत लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीतील काही कर्मचारी घटनास्थळी धावले, परंतु त्यांना चोरटे सापडले नाहीत.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बस स्थानकात दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहादा बस आली. या बसमध्ये आधीच गर्दी होती, त्यात बस येताच प्रवाशांनी बसमध्ये चढण्यास गर्दी केली. या गर्दीच्या फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या ३ महिला प्रवाशांच्या गळ्यातील पोत लंपास केली. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. या वेळी काही महिला या बसमध्ये न चढता रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने निघून गेल्यात. पाळधी पोलीस चौकीतील काही कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र त्यांना कुणीच सापडले नाही. याबाबत पाळधी पोलीस चौकीत कुणीच तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.